पान:व्यायामशास्त्र.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५८ ] || मोकळी हवा. जेथे हवा खेळती आहे अशा जागेत व्यायाम करावा. घाम आलेल्या अंगावर वारा लागल्याने अपाय होतो, म्हणून वारा अथवा हवा स्वभावतःच अपायकारक आहे अशी जी सर्वसामान्य समजूत आपल्या लोकांमध्ये झालेली आहे ती निराधार आहे. घाम आलेल्या अंगावर वारा लागल्याने अथवा शरिराचा भाग वारा लागून फार थंड झाल्याने प्रकृतीस अपाय होतो, ही गोष्ट खरी आहे; परंतु त्यावरून हवा अपायकारक आहे असे मानणे म्हणजे कडक उन्हांत फार वेळ बसल्याने अपाय होतो म्हणून ऊन स्वभावतःच अपायकारक आहे असे मानण्यासारखे वेडगळपणाचे आहे. ऊन जसे प्राणिमात्राचे जीवन आहे तशीच हवाही आहे. रक्तशुद्धीस आक्सिजन वायु अवश्य आहे हे आतां शिकलेल्या बहुतेक सर्व लोकांस माहीत झाले आहे. आपल्या फुफ्फुसांना ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होण्यास स्वच्छ हवेचा भरपूर पुरवठा झाला पाहिजे; व व्यायाम करतांना तर रक्तशुद्धीची क्रिया जोराने चाललेली असते, म्हणून अशा वेळी शुद्ध हवेच्या भरपूर पुरवठ्याची विशेष आवश्यकता आहे. याकरितां व्यायामाच्या जागेत स्वच्छ हवा खेळती राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. व्यायामाच्या जागेतील हवेचे येणेजाणं बंद करणे हे घरांतील पाण्याची तोटी व मोरीचे तोंड हीं बंद करून घरांतील घाण पाण्याचा उपयोग करण्यासारखे अस्वच्छपणाचे व अपायकारक आहे. आपण जो श्वास बाहेर टाकतो त्यांत विषारी वायूच प्रमाण इतके असते कों, दोन तासांच्या उच्छ्वासांतील सर्व विषारी वायु एकत्र केला तर त्यांतील विषाने एक मनुष्य तत्काल मरेल. या कारणास्तव आपल्या भोवतालची हवा खेळती ठेवणे अवश्य आहे.