पान:व्यायामशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५७ ] न येतां जास्त व्यायाम आपल्या हातून घडतो. सकाळी हवेत गारवा असतो व हवा फार स्वच्छ व आल्हादकारक असते म्हणून ही वेळ व्यायामास फार चांगली आहे. भोजनोत्तर व्यायाम करू नये. जेवणानंतर कमीत कमी दोन तासपर्यत व्यायाम करूं नये. ज्यावेळी एखाद्या इंद्रियाकडून काम व्हावयाचे असते, त्यावेळी त्या इंद्रियाकडे रक्ताचा प्रवाह जोराने चालतो. कारण रक्त में शरीररूपी एंजिन चालविणारी वाफ आहे. जेवणानंतर पोटामध्ये अन्नपचनाचे काम चालावयाचे असते म्हणून यावेळी पोटाकडे रक्ताचा प्रवाह जोराने चाललेला असतो.* म्हणून जेवणानंतर लागलीच व्यायाम केल्याने, ज्या अवयवांना व्यायाम घडत असतो त्यांकडे पोटाकडील रक्ताचा प्रवाह जातो व पोटांत रक्ताचा पुरवठा कमी पडून पोटांतील अन्नपचनाचे कामास प्रतिबंध होतो. या कारणाने अन्नपचन बरोबर होत नाही. म्हणून जेवणानंतर व्यायाम करूं नये; एवढेच नव्हे, तर विशेष श्रम पडणारे दुसरे कोणतेही काम कांहीं वेळपर्यंत करू नये. | व्यायामाचे प्रमाण. व्यायाम आपल्या शक्तीप्रमाणे करावा व तो क्रमाक्रमाने वाढवावा. व्यायाम वाजवीपेक्षा कमी केल्याने अथवा वाजवीपेक्षा थोड्या प्रमाणाने वाढवीत गेल्याने जे नुकसान होण्याचा संभव आहे, त्याहून वाजवीपेक्षा जास्त व्यायाम केल्याने पुष्कळ जास्त नुकसान होणारे आहे. म्हणून व्यायाम बेताने करावा व बेतानेच वाढवावा.

  • जेवणानंतर मेंदूस व इतर इंद्रियांस सुस्ती येते याचे कारण त्यांतील रक्ताचा प्रवाह कमी होतो हेच होय.