२
॥ नरोजाञ्जानीते व्रतमपि हरे नैं कुरुते ॥ ॥ नकाशिर्मक्कावा शिव ! शिव! नहिँदुर्न यवनः ॥
ही गोष्ट माझे मनांत येऊन मी एके दिवशी उद्विग्न चित्ताने या गोष्टीचा विचार करीत असतां मजला वाटलें कीं, आह्मी गृहस्थाश्रम स्वीकारून इतर आश्रमांचे पोषण करावे, अशा परोपकारबुद्धीने प्रपंच करणारे सात्विक लोक, परस्थांच्या संसगीने द्रव्यलोभी व ठक बनू लागलो. आह्मां हिंदूचे मुख्य लैंगिक चिन्ह झटले झणजे, आमची शेंडी, पण ती देखील पाश्चात्य रिवाजाप्रमाणे वाढविलेल्या माथेरानांत आज दिसत नाहिंशी झाली. युरोपांतील अठरा टोपकरांनी आझांस टोपी घातल्यामुळे, आमच्या देशांतील अठरापगड जातीच्या डोक्यावरील पगड्या नाहिंशा होत चालल्या. आमच्या देशी भाषांत इंग्रेजी शब्दांचे डिस्पंपोरशनेट अॅमिक्सचर होऊन त्या हाफ्क्यास्ट बनल्या. सारांश, इतर राष्ट्रांपासून आमच्या हिंदी राष्ट्रास वेगळे करणारे सर्व भेदक गुण नाहिसे होत चालल्यामुळे, ते थोड्याच दिवसांत दुस-या एका बलिष्ठ राष्ट्रांत समाविष्ट होऊन त्या राष्ट्राचा झारखेडा बनणार की काय, अशी शंका येऊ लागली.
मी अशा त-हेच्या विचारपरंपरेत मग्न असतां निराशेने १ ही इंग्रेजी शद्वाची योजना हल्लीच्या धेडगुजरी भाषा चोलण्याच्या प्रचाराची दक आहे.
पान:व्यवहारपद्धति.pdf/9
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही