Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना ••••••• 0 2-- प्रकृत ग्रंथाविषयी प्रस्तावनेत सांगावयासारखी मुख्य गोष्ट झटली झणजे ग्रंथाचा उद्देश काय, व त्याचा उपयोग किती, हे वाचकांस ग्रंथ वाचण्यापूर्वी कळविणे, हीच होय. या गोष्टीची पूर्वसूचना असली झणजे, वाचकांस ग्रंथवाचनाविषयी लालसा उत्पन्न होते. परंतु हे काम या पुस्तकाच्या प्रकाशक मंडळीने पूर्वीच उरकून टाकिलें आहे. त्यांनी आपल्या चटकदार दोन शब्दांतच वर सांगितलेल्या मुख्य गोष्टीचे मार्मिकपणाने प्रतिपादन करून ग्रंथकाराचे लेखनश्रम हलके केले, यामुळे केवळ सांप्रदाया करितांच लेखक या नात्याने मजला पूर्वोक्त गोष्टीचे किंचित् पुनरुद्धाटन करावयाचे आहे. आपल्या देशांत दिवसेंदिवस पाश्चात्य लोकांचे दुळणवळण वाढू लागल्यामुळे, आपला स्वधर्माभिमान, आचारविचार, प्रापंचिकव्यवहार, व पहिराव इत्यादि गोष्टींतील पूर्वपरंपरा अगदीं सुटत चालली, व तेणें करून आपल्या राष्ट्राची स्थिति खालील पद्यांत वर्णन केल्याप्रमाणे विचित्र झाली आहे. ॥ न संध्या संधते नियमित निमाजान्न कुरुते ॥ नवा मौजीबंधे कलयति नवा सौनत विधिम् ॥