Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण मागसलेल्या असतात, ही चाल बरी नाहीं. रोजच्या पाँचपंचवीस रकमांच्या देवघेवीची खतावणी चालू तारखेवर ठेवणें कांहीं जड आहे, अशी गोष्ट नाहीं. कारणपरत्वें आठ चार दिवसांच्या फरकाने मागसली असली, तरी फारशी नड नाहीं, परंतु फार मागसलेली असू देऊ नये, कारण, कोणाचाही हिशेब त्याने मागितल्यापासून तास दोन तासांच्या आंत त्याच्यापुढे ठेवितां येईल, अशी जमाखर्चाची शिस्त असावी, हे बरे. रोजकीर्दीवर मळपृष्ठासारखीं कांहीं कोरी पाने अंक घातल्याशिवाय ठेवून त्यांवर कुटुंबांतील मुलेबाळे जन्मास येतील, त्यांच्या जन्मवेळा, तिथि, वार, व नक्षत्र यासुद्धा टिपलेल्या असाव्या, तसेच कोणी मयत झाले असल्यास त्यांच्या मृत्युतिथि नोंदून ठेवाव्या, याशिवाय सालाबादी कुलाचार, कुलदेवतांची नांवे, वार्षिक नैवेद्य, व लग्नमुंजी इत्यादि कार्यांत कुलाचाराप्रमाणे बोडणे, गोंधळ, वगैरे घालण्याची जी परिपाठी असेल, ती नोंदून ठेवावी, झणजे मुलांबाळांस ह्या गोष्टींची माहिती व कुलपरंपरागत पद्धति ठाऊक होते. याशिवाय हव्यकव्यें, श्रावणी व लग्नमुंजी इत्यादि कृत्यांत लागणारे पदार्थ, झणजे पानपत्रावळ, तैवजीसामान, अत्तरगुलाब, दर्भसमिधा, नारळसुपाच्या, कापडचोपड इत्यादि सामानाच्या यादी व