३ र. ] दिनचर्या. ७३ कैफियती कशा तयार करावयाच्या, पुराव्यास कागद कोणते द्यावयाचे, व वकिलास कोणते मुद्दे व हकीकती कुळवावयाच्या, इत्यादि गोष्टींचीं टांचणेंटिपणे स्वहस्ते करावी. ही कामें केवळ कारकुनावर टाकू नयेत. नक्त व ऐनजिनशी कीर्दीचीं तेरजें व आढावे, लक्षपूर्वक ध्यान आणावे. कारकुनाकरवी जडजवाहीर, दागदागिना, उंची वखेंपात्रे, भांडीकुंडी, व इतर प्रकारच्या हरजिनशी वस्तु, यांचे वजनमाप व नग यासुद्धा यादी, कोणची वस्तु कोणापासून कधी घेतली, किंवा करविली, यांच्या तपशिलासहीत तयार करून दप्तरी ठेवाव्या. गांवगन्नावार असलेल्या शेतवाडयांची नांवें, एकरगुंठे, सरकारी आकार, वरकस व पोटखराब यांची फोड, कसणाराचें नांव, मक्त्याची ठराव, व त्यास जामीन जो कोणी असेल त्याचे नांव, इत्यादि तपशिलाचे फेरिस्त तयार ठेवावे. गुराढोरांची नावें, रंग, शिंगशिंगोटी, व अमाशी उमर या तपशिलाची नोंद ठेवून, दरसाल एक दिवस नेमून, त्या दिवशीं मरगत व नवी उपज काय झाली, हे पहात . असावे. जमाखर्ची लिहिण्यासंबंधाने रोजची देवघेव कच्या खड्स व रोजकीर्दीस रोजचे रोज बार होतच असते, परंतु खतावण्या पुष्कळांच्या घरी सहासहा महिन्यांच्य
पान:व्यवहारपद्धति.pdf/86
Appearance