६९ ३ रें. ] दिनचर्या एक मठ विद्यार्थी गुरूजवळ व्याकरणशास्त्राचे अध्ययन करून घरी परत जात असतां, एके गांव, गांवाबाहेर शंकराचे देवालय होते, तेथे संध्याकाळी वस्तीस उतरला. तिनसांजां देवदर्शनास गेलेल्या लोकांनी त्यास येथे रात्री वाघ येत असतो, ह्मणून येथे उतरू नये, गांवांत कोणाच्यातरी घरीं उतरावे, असे सांगितले, परंतु हा गृहस्थ पडला व्याकरण शिकलेला, त्याने मनांत विचार केला कीं, गुरुजींनी आपणास व्याघ शब्दाची व्युत्पत्ति, “ विशेषेण आघायते स व्याघ्रः अशी सांगितली आहे, त्या अर्थी वाघ आलाच तर, तो हुँगील आणि जाईल, त्यांत आपले काय बिघडणार आहे ! असे ह्मणून त्याने कांहींएक विचार नः करितां, तेथेच तळ दिला. गांवक-यांनी सांगितल्याप्रमाणे रात्री वाघ येऊन त्याने शास्त्रीबोवांचा चट्टामट्टा केला.. अशा प्रकारचे अध्ययन किंवा वर्तमानपत्रांचे वाचन निरर्थक होय. वाचलेलें नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे. आचरणाशिवाय नुसते पांडित्य काय उपयोग ? * क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.” असे रामदासस्वामींनी झटलें आहे, ते उगाच नाहीं. काव्ये, नाटके, व्याकरण, इतिहास, पदार्थविज्ञान, ब गणित इत्यादि प्रकारचाही
पान:व्यवहारपद्धति.pdf/82
Appearance