Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवहारपद्धति. [ प्रकरण ६८ टिया पिटाव्या, व उलट प्रकार वाचण्यांत आला की, तोंड आंबट करावे, एवढेच कायतें. पण बोअर किंवा जपानी लोकांचे सामर्थ्य आपणास प्राप्त होण्यास आपण काय केले पाहिजे, हा विचार एकाच्याही मनांत येत नाहीं. जो जपान देश, साठ पाउणशे वर्षांपूर्वी बहुतेक अज्ञानांधःकारांत बुडालेला होता, जेथील लोकांची शस्त्रास्त्र सटली झणजे तीरकामटे, तोच देश ३तक्या थोड्या अवधींत अर्वाचीन पाश्चात्य युद्धकलेंत अत्यंत प्रवीण होऊन, एका बलिष्ठ पाश्चात्य राष्ट्राशीं टक्कर मारतो, आणि आझी फार प्राचीन कालापासून शस्त्रास्त्रविद्येत प्रवीण असतां, जवळ जवळ तेवढ्याच अवधींत अगदी दुर्बळ बनतों, याचे कारण काय, हे कोणी ध्यानी आणितो आहे काय ? जपानी लोकांचा स्वार्थत्याग, उद्योग, विद्याव्यासंग, व दृढनिश्चय ह्या गोष्टींचा कित्ता आह्मी गिरविला, तर आमच्या देशाचे दैन्य कशास राहील ? शिळोप्याच्या वेळीं चव्हाट्यावर बसून चार गप्पा मारतां याव्या, व साहेब लोकांचे माकडा सारखें अनुकरण करावे, एवढ्या करितांच वर्तमानपत्रे वाचावयाची असतील, तर त्यांत कांहीं फायदा नाहीं. लेखांतील गूढ तात्पर्य समजून न घेतां, नुसत्या पोपटपूची शब्दचर्चेत प्रावीण्य संपादन केले तर फायदा काय !