१ लें. ] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. २३ चरण करू पाहणा-या दुर्बल मनुष्यास पीडा मात्र होते. अशा मनुष्यास धर्माचे रहस्य नीट समजत नाहीं, असेंच ह्मणणे भाग पडते. धर्म, अर्थ व काम ह्या त्रिवर्गापासून पीडा व सुख ह्या दोन्ही गोष्टी होत असतात, यास्तव पीडांचा त्याग करून शाहण्याने सुखचा संग्रह करीत असावे; ज्या धर्मानें आपलें कर्षण होते तो धर्म नव्हे, ते व्यसन अथवा कुधर्म होय; यास्तव केवळ धमच्या मागे लागून अर्थ व काम ह्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच अर्थ व काम ह्यांवरच केवळ नजर देऊन धर्माकडे दुर्लक्ष करणे योग्य नाहीं. तद्वत् कामतृप्तीसाठीच सर्वकाळ झटत राहिल्यास त्यापासून धर्म व अर्थ ह्या दोहोंचाही नाश होऊन सरतेशेवटीं आपलाही नाश होतो. याकरितां या तिघांपासून परस्परांस अडथळा न होईल अशा रीतीने कृत्ये केल्यास ती सुखप्रद् व फलदायी होतात. १ यस्य धर्मोहि धर्मार्थ केशभाड् न स पण्डितः। न स धर्मस्य वेदार्थ सूर्यस्यान्धप्रभामिव ।। २३ ।। वनपर्व, अ० ३३ २ त्रिवर्गे त्रिविधा पीडा ह्यनुबन्धस्तथैव च । अनुबंधाः शुभाज्ञेयाः पीडास्तु परिवर्जयेत् ।। ७० ॥ धर्म विचरतः पीडा सापि भ्द्वायां नियच्छति । अथै चाप्यर्थलुब्धस्य कामस्यातिप्रवर्तिनः ॥ ७९ ॥ आदिपर्व, अ० १४२.
पान:व्यवहारपद्धति.pdf/36
Appearance