२२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण कठिण. यामुळे जे कृत्य प्राणिमात्रास सुखावह होते तोच धर्म व तेच सत्य, व ज्या कृत्याने आपणासहवर्तमान आपल्या जातिबांधवांस क्लेश होतील तो कुधर्म, असे शाहण्यांनी स्थूलमानाने ठरवून ठेविलें आहे. जेव्हां दोन धर्मतत्त्वें परस्परविरोधी असून एकमेकांस बाध आणितात, तेव्हा त्या संबंधाने गुरुलाघवाविषयी विचार करून ज्यांत बाधा कमी असेल त्याचा स्वीकार करावा, व दुसरे तत्त्व कुधर्म समजून सोडून द्यावे. अर्थरहित व केवळ निष्काम असा धर्म, संसारी जनांस आचरण्याची शक्ति नसते, यास्तव तसा धर्म आ १ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमिति धारणा। विपर्ययकृतो धर्मः पश्य धर्मस्य सुक्ष्मताम् ॥ ४॥ वनपर्व, अ० २०९. अतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्नाः नैकोमुनिर्यस्य वचः प्रमाणम् । धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ॥ २ धर्म या बाधते धर्मो न स धर्मः कुवम् तत् । अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम ! ॥ ११ ॥ विरोधिषु महीपाल ! निश्चित्य गुरुलाघवें। न बाधा विद्यते यत्र ते धर्म समुपाचरेत् ॥ १२ ॥ गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये । यतो भूयस्ततो जन्करुष्व धर्मनिश्चयम् ॥ १३ ।। वनपर्व, अ० १३१. कर्षणार्थी हि या धर्मो मित्राणामात्मनस्तथा । व्यसनं नामताजनधर्मः स कुकर्म तत् ।। २१ ।। वनपर्व, अ० ३३. ३ सर्वथा धर्मनित्यं तु पुरुष धर्मदुर्बलम् । त्यजतस्तात ! धर्मार्थों प्रेतं दुःखसुखे यया ॥ २२ ॥ वनपर्व, अ० ३३.
पान:व्यवहारपद्धति.pdf/35
Appearance