२७८ व्यवहारपद्धति. [ प्रकरण राकुल रहावे,आग्रह बिलकुल धरूं नये.सर्प जसा अंगावरची कांत एकदां टाकिली म्हणजे तिच्याविषयी आस्था धरीत नाहीं, तद्वत् एकदां संसाराचा त्याग केल्यावर त्यांत पुनश्च लिपटू नये. उदासीन राहून परमशाश्वत जो परमार्थ, त्याची जोड करण्यांत उर्वरित आयुष्य खर्च करावें. परमार्थ साधण्यास वनांतच गेले पाहिजे असे नाहीं. संसाराकडे ओढ ठेवून तपोवनास गेले तर, पुयांतील तुळशीबागेतल्या देवदर्शनाची नक्कल उडावयाची, तुळशीबागेत देवदर्शनास जाणारे लोक पायरीशी जोडा ठेवून गाभा-याच्या दरवाजापाशी रामाकडे पाहून ॥ * अन्यथा शरणं नास्ति ? ॥ इतके ह्मणत आहेत तोंच त्यांच्या मनांत भामट्या जोडा उपटील, हैं येऊन मागे वळून जोडयास ॥ त्वमेव शरणं मम ॥ असे म्हणतांना पुष्कळांनी पाहिले असेलच, तसेच पुन रपि देवाकडे बघून * ॥ तस्मात् कारुण्यभोवन ॥” हा चरण ते संपवितात, तोच जोड्याकडे पाहून ॥रक्ष रक्ष परमेश्वर॥” अशी हात जोडून त्यांस जोडयाचा प्रार्थना करण्याची पाळी येते. अशा रीतीनें आसक्ति - वून तपोवनांत जाण्यापेक्षां घरीं राहून विरक्तपणाने । वरभजनांत काळ घालविल्यास घरच तपोवन बनत: झणूनच ज्ञात्यांनी झटलें आहे.
पान:व्यवहारपद्धति.pdf/287
Appearance