७ वें. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २७७ करून त्यांत संदिग्ध, अनिश्चित, व अशाश्वत लाभाविषयी आसक्त न होतां परमार्थ जोडावा, हेच विचारशील मनुष्यास योग्य होय. असो, परमार्था विषयीं गाफल न राहतां छानीने संसार करून मुलेबाळे कर्ती झाली, व आपलें उतारवय झाले, लणजे संसाराचा सर्व भार पुत्रावर सोंपवून आपण फक्त मंत्र्याचे काम करावे. पण, तेंही आसक्ति ठेवून आग्रहाने करू नये. अनासक्तपणाने व परोपकार बुद्धीनें मंत्र्याचे काम केलें ह्मणून परमार्थ संपादनास कांहीं व्यत्यय येतो, असा अर्थ नाहीं. श्रीरामदासस्वामीनींही आसक्ति न ठेवितां परोपकार बुद्धीने राजकारणांत मन घातले होते, परंतु तेणेकरून त्यांच्या परमार्थीस तिळभर सुद्धा व्यत्यय आला नाहीं. संसाराचा सर्व कारभार पुत्राच्या स्वाधीन करतांना अत्यल्प द्रव्य आपलें खासगी झणून आपल्या ताब्यात असू द्यावे, व त्याचा व्यय दानधर्म, आणि आपल्या पश्चात् कन्या, दौहित्र, मित्र व सेवक यांस आपली आठवण झणून देणगी देण्यांत करावा. संसार वल्हावितांना पुत्राकडून कांहीं गैर होत असल्यास त्यास आपला अनुभव सांगून हितोपदेश करावा. ऐकिल्यास बरेंच आहे, न ऐकल्यास भविनव्या प्रमाणे जे व्हावयाचें तें होईल, असा विचार करून नि
पान:व्यवहारपद्धति.pdf/286
Appearance