Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण सांप्रत स्त्रीजातींत इतकी धर्मबुद्धि वाढली आहे कीं, तेणेकरून स्वर्गलोकीं पाऊल ठेवण्यास रिकामी जागा सांपडेल किंवा नाही, याबद्दल संशय उत्पन्न होऊ लागला आहे. अति साधुवृत्ति, अतिदान, व अतिव्रताचरण या गोष्टी गृहस्थास अश्रीक असल्यामुळे, जणु परमेश्वरास कींव येऊन त्याने स्त्रियांच्या सद्यःकालीन अतिदानशीलतेस व अतिव्रताचरणास मर्यादेत राखावे ह्मणून दंभाजीरावांची त्या कामावर बुद्धिपुरस्सर नेमणूक केली असावी असे वाटते. दांभिक व्रताचरणाने व कुपात्र दान करण्याने, ह्या स्त्रियांच्या अमर्याद वाढलेल्या दानधर्मास आळा पडतो आहे ह्मणून बरे आहे. तसे नसते तर स्वर्गीत या पूर्वी कधीच स्त्रीराज्य होऊन गेले असते. स्त्रिया एकमेकींच्या चढाओढीनें दांभिकपणाखातर लुडबुडे ब्राह्मणांस व्रतवैकल्याच्या मिषाने दानधर्म करून द्रव्याचा अपव्यय करितात, तो कुटुंबनायकाने सदुपदेश करून व प्रसंग पडला असता आपला अधिकार चालवूनही बंद केला पाहिजे. अशा अविचाराने केवळ द्रव्यनाशच होऊन रहाता तर पुरवले असते, पण त्याच्या योगाने दात्याच्या व प्रतिग्रहोत्याच्या अनेक | १ अत्यार्यमनिदातर मतिसुरमतिव्रतम् । प्रज्ञाभिमानिने चैव श्री भयान्नोपसर्पति ।। ६४ ।। उद्योगपर्व, अ. ३९