Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ । व्यवहारपद्धति. [ प्रकरण अथवा मेजवानी ह्मणावें हैं बरे दिसते, व ती मैत्री व कीर्ति इत्यादि ऐहिक फल देण्यास योग्य होईल. पण तीपासून पुण्यफल मिळेल किंवा नाही याबद्दल मजला संशयच वाटतो. लग्नकार्यादि मंगलकृत्यांत धर्मार्थ व कीर्त्यर्थ अशा दोन्ही प्रकारच्या अनसंतपणाचे संमेलन असते. यास्तव तशा प्रसंगी वर सांगितलेल्या धनाढ्य लोकांस सत्कारपूर्वक भोजन दिलेच पाहिजे, त्याबद्दल आमचें कांहीं झणणे नाहीं. फक्त पारमार्थिक उद्देशाने केलेल्या अन्नदानांत अशा प्रकारचे लोक केवळ संख्यापूर्तीस्तव गोळा करणे सयुक्तिक दिसत नाही, असे आमचे झणणे आहे. ज्यांस जरूर नाही, अशा खात्यापित्यांस धर्म किंवा दान समजून पोट फुटे तों मिष्टान चारणे, व इतर जातीच्या गरीवदुबळ्या अन्नाथ्र्यांच्या पदरीं या बैडालवृत्तीने व बकवृत्तीने वागणा-या मुनिजनांच्या उष्ट्या पत्रावळीही पडू न देणे, हे कोणच्या प्रकारचे अन्नदान ते आह्मांस नकळे! अनार्याची क्षुधार्तता व अनेच्छा हेच अन्नदानाविषयी पात्रत्व. त्यास वय, लिंग, जाति, व विद्या यांची अपेक्षा नसावी असे आह्मांस वाटते. असे असतांही ख-या अन्नाथ्र्यांच्या किंकाळ्यांकडे लक्ष न देता, उलटे त्यांस हिडिसफिडिस करावे, आणि ज्या