Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण त्यांच्या गुणावगुणाकडे बघून द्यावयाचा नसतो. सरकारच्या गादीकडे बघून द्यावयाचा असतो. यास्तव सरकारी कामगार कसाही असो, त्याच्या खाजगी वर्तनाकडे नजर न देतां, त्याशी आपण आदबीनेच वागावे. कामकाजाविषयी रदबदली करितां यावी ह्मणून पुढे पुढे करणे, ह्यास मान राखणे ह्मणत नाहीत, ते श्वानासारखे शेपूट हालविणे होय. अशा कृतीने अधिका-याचा मान ठेविलासे होत नाहीं, व आपलाही मान रहात नाहीं. कामकाज रितीप्रमाणे जसे व्हावयाचे असेल तसे होईल, त्याची पर्वा बिलकुल करू नये. सरकारी कामगार जसे मोठे, तसे आपणही मोठे, असे मनांत वागवून त्यांजपार्शी आपलाही मान जवळ जवळ त्यांच्या बरोबरीचाच असावा. राजाधिकारामुळे सरकारी कामगार कितीही मोठा असला, तरी त्याने आपला देह व नागरिकपणाचा हक्क सरकारास विकला आहे, व तो वेतनाच्या मोबदल्यांत सरकारची ताबेदारी उठविणारा आहे. परंतु, प्रजाजन कितीही दीन असला, तरी तो स्वतंत्र नागरिक आहे. व सरकारचे वेतन न खातां सरकारास साहाय्य करणारा आहे. यास्तव एखाद्या कामागाराने गर्विष्टपणामुळे अगर उन्मत्तपणामुळे आपला मान ठेविला नाहीं, तरी तो आपला आपण राखवेल तेवढा राखिला