Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वें. ] शिष्टाचार व.द्रव्यविनियोग. २१५ प्रार्थनापूर्वक सांगावयास नकोच; कारण, तो आमचा विहित असा कुलाचारच आहे. परंतु, केवळ बलाधिक्यामुळे निष्प होऊन क्रूरतेने लोकांस अंकित करून गांजणारे जे आसुरी तेज ते दैवी तेज नव्हे, यास्तव तशा तेजाविषयीं एकनिष्ठ असावे, असे सांगणाराने सांगावे तरी कसे, व सांगून ऐकणार तरी कोण. प्रतिष्ठित ह्मणविणाराने सरकारदरबारांत आपलें वजन अवश्य राखिले पाहिजे. सरकारदरबारांत मान नसेल तर प्रतिष्ठितांस लिहिण्यांत “राजमान्य राजश्री हे उपपद लावण्याची सार्थकता काय ? राजसभेत ज्यास मान मिळतो तोच सय. इतर सर्व आडनांवाचे सभ्य होत. सर्व भूमंडलावर राजाहून थोर कोण, व त्यास जो मान्य त्यास अमान्य तरी कोण ह्मणणार ? सरकारदारबारांत आपले कामकाज पडते, व ते आपल्या तर्फेने व्हावे, इतकाच हेतु बाळगून जा आपले वजन दुबारांत राखू इच्छितो, त्याचे वजन तेथे चांगले पडणार नाही, हे सर्वांनी पुरें लक्षात ठेविले पाहिजे. राजापेक्षा कोणी मोठे नाही, हे नुकतेच सांगितले आहे, व राजतज राजसेवकांचे ठिकाणीं प्रविष्ट झालेले असते, यास्तव त्या राजतेजामुळे राजसेवकही मोठे समजले पाहिजेत, व त्यांचा मानही ठेविला पाहिजे. त्यांस मान द्यावयाचा तो