व्यवहारपद्धति. [ प्रकरण लांचलुचपतीने चुकवितां येत नाही. तस्मात् अनीतीने प्राप्त होणारे सुख हे वध्यमनुष्यास सुळावर देण्यापूर्वी मिष्टान खाऊ घालतात त्याप्रमाणे दुःखपरिणामी आहे. असले ओंगळ सुख भ्रमिष्टाशिवाय कोणीही ग्राह्य करणार नाहीं; परंतु दुर्दैवाने या देशांत सांपत अन्यायाने प्राप्त होणा-या दुःखपरिणामी, नकली सुवास भुलणारे भ्रमिष्ट फार निपजू लागले आहेत, ते पुढे आपणास सुळावर चढावयाचे आहे ह्या गोष्टीचे भान विसरून पुढे आलेल्या मिष्टानावर यथेच्छ ताव देत बसतात हे केवढे आश्चर्य ! असो, इतका वेळ केलेल्या नीतीच्या निरूपणावरून तिची उपयुक्तता व आवश्यकता ध्यानी आली असेलच; आता तिचे स्वरूप कसे आहे ह्याविषयी विचार करू. नीतीचे स्वरूप दोन प्रकारचे आहे, एक सरळ व दुसरे कुटिल; सरळ नीतीस सामान्यनीति व कुटिल नीतीस विशषनीति, किंवा राजनीति असे ह्मणतात. सामान्यनीति एकमार्गी आहे. ती पारलौकिक सुखावर दृष्टि देऊन आपली गमनदिशा न बदलतां मार्गक्रमण करीत असते, मग वाटेत कांटे लागोत, किंवा नद्या, नाले आडवे येवोत; कितीही अडचणी आल्या तरी ती आपली गमनदिशा सोडीत नाहीं.
पान:व्यवहारपद्धति.pdf/25
Appearance