Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण प्रेमभाव राहणे शक्य आहे, तितकाच हल्लीं सासवा सुनांत प्रेमभाव राहणे शक्य आहे. सासवा आपल्या आचरणाने सुनांस वाईट वळण लावीत असूनही, चांगले वळण लावण्याच्या मिषाने त्यांस निष्कारण क्रूरतेने वागवितात, व सुनाही प्रौढत आल्यावर सासवांचा सूड उगवितात, असा धुमाकूळ बहुतेक कुटुंबांत चाललेला दृष्टीस पडतो. हा प्रकार फारच गैरशिस्त होय. सासूसासन्यांनीं सुनांस कैदशीर वागविणे जरूर आहे, तरी तसे वागवितांना निष्ठुरता केलीच पाहिजे असे नाही. नि कारण कठोरता धारण करून केलेला उपदेश रुचत । नाहीं, व ठसतही नाही. यास्तव सुनांस वात्सल्याने वागवून, व त्यांच्या मनांत आपणाविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न करून, ओळा लाविला पाहिजे. जी सून आपल्या संसाराची पुढे लवकरच मालकीण होणार, तिचा चालरीत शिकविण्याच्या मिषाने छळ करणे, व तिला घरांत काडीचीही सत्ता न देणे, हा सासवांचा वेडेपणा आहे. मुलगा जसा युवराज तशी सूनही युवराज्ञी आहे. संसारांत ज्याच्या त्याच्या दर्जा प्रमाणे सर्वांस सत्ता व अधिकार असणे जरूर आहे. तसे नसेल तर ज्यास त्यास माझा अधिकार घरांत चालावा असे वाटून कोणी कोणाचे ऐकत नाहीं व प्रत्येक जण दुस-यावर चरफडत राहतो.