Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कौटुंबिक २३३ ६ वे. ] कौटुंबिक विचार. । विद्या व वर्तन ह्यांच्या शिक्षणाचा आरंभ प्रथमतः मातापितरांच्याच मुखाने होणे प्रशस्त आहे. मुलास गायत्री मंत्रद्वारे वेदाध्ययनाचा आरंभ पितृमुखानेच होणे प्रशस्त गणिले जाते, पित्याच्या अभावी किंवा आपत्तींत मात्र तो दुस-याच्या मुखाने होणे विहित मानले आहे. मातापितरें हीं कन्या व पुत्र ह्यांची आद्यगुरु होत, असे असूनही ती या कामीं उदासीन राहतात, किंवा या कामाची दुस-यावर निरवानिरव करितात, हे केवढे आश्चर्य! पण ही इतकी हेळसांड करूनच जर ती स्वस्थ बसत तर कांहींतरी दुःस्वांत सुख मानून घेतां आलें असतें. वाप सद्ण शिकवीत नाहीं तर नाहींच, पण उलटा मुलास संसारदक्ष बनविण्या करितां परस्वापहार, अनृतवादित्व, व कुटिलता इत्यादि दुर्गुणांची तालीम देत असतो, व आई त्याबद्दल अभिनंदन करीत असते. अशा अविचारी वर्तनामुळे बापाचे मुलांवर वजन न पडतां, तो वापाची अमर्यादा करितो, व सून सासूस केराबरोबर लोटते, व नवन्यास दास बनवू पाहते. सांपतकालीं सासवासुनांची परस्पर वागणुक कशी असते, हे सर्वांस विदितच आहे त्या बद्दल वृथैव लेवनविस्तार कशास पाहिजे ? उंदीर आणि मांजर, किंवा गाय आणि वाघ, अशा भक्ष्यभक्षक प्राण्यांत जेवढा