[ प्रकरण २०८ व्यवहारपद्धति. ८ सरकारे, बाईसाहेबांस जो हुकुम करतील, तो सूक्त असो अगर असूक्त असो, त्याबद्दल बिलकुल नाहीं हो न करितां, बाईसाहेबांनीं तो बजाविला पाहिजे, तथापि सरकार जो हुकुम करणे, तो समजूनच करतील. ( कलम २५ पहा.) ... वरील कलमबंदी इ० स० १८४२ नंतर लिहिली आहे, त्यावरून साठ पाउणशे वर्षांपूर्वी स्त्रियांच्या वागणुकीसंबंधे किर्ती दक्षता ठेविली जात असे, हे सहज लक्षांत येण्यासारखे आहे. अलीकडे या गोष्टीसंबंधे जी बेबंदशाही माजली आहे, ती तरुण नोकरमान्यांच्या भिन्न विचारसरणीमुळे व गाफलपणामुळेच माजली, असे कोणीं अनुमान केल्यास ते अगदी निराधार आहे, असे आह्मांस ह्मणवत नाहीं. || दुसरे कारण गतानुगतिकत्व व संसर्ग हे होय. इतर देशांपेक्षां गतानुगतिकत्व व दांभिकपणा, हे दोन्ही दुर्गुण प्रस्तुत आमच्या देशांत फारच वाढले आहेत. त्यांत पुरुषांपेक्षां स्त्रियांत तर ते अमर्यादच. राधाबाईने सांवरीच्या फुलांची लाखोली वाहिली कीं, लक्षुमबाई लागली पारंग्याच्या फुलांचा कोट वहावयाला. अशी गतानुग १ तिसरे रघोजी भोंसले, हे स्वतःविषयी काही बोलणे झाल्यास * सरकार ? या पदाचा उपयोग करीत असत.
पान:व्यवहारपद्धति.pdf/217
Appearance