Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे. ] कौटुंबिक विचार. २०७ नये, व पिकदाणींत थंकू नये, हात धुणे झाल्यास तस्तांत न धुतां, जोत्यावर बसून धुवावे. त्यांज समोर विडा मात्र खावा. त्या वरती आल्यास, त्यांस भरताजिम देऊन आपल्या तक्याशी बसवावे. ( कलम ७ पहा.) । ४ दोन चार दिवसां आड फुरसत करून पाकनि पत्ति आपल्या हाते करावी, आचारी वगैरे माणसे शिकवितील. पदार्थ बिघडल्यास चिंता नाहीं. जो पदार्थ आपणास अगर सरकारास आवडेल, तो आचारी वगैरे माणसे हाताशी घेऊन आपण जातीने करावा. ( कलम ८ पहा.) ५ कोणी बाहेरची बायकामाणसे भेटीस आल्यास त्यांचा योग्यतेनुरूप सन्मान करावा. व पानसुपारी देऊन त्यांची बोळवण करावी. ( कलम ९ पहा. ) ६ हलक्या माणसांशी कानगोष्टी करू नयेत, व त्यांच्या तोंडी लागू नये, आपला बोज हलका पडतो; त्यास दाबांतच ठेवणे नीट आहे. नोकर माणसांकडून चाकरी बराबर घ्यावी, चुकल्यास सजा मुनासब करावी. ( कलम ११ व १८ पहा.) ७ लेंकूरपणाचा स्वभाव टाकून बुदबारी अंगीं ठेवावी, बेजाहा हांसू नये, व धावू नये.(कलम२० पहा.) | १ प्रदता, भारदस्तपणा.......... .