२०२ व्यवहारपद्धति. | [ प्रकरण अशा निरंकुश व डोईजड झालेल्या बायका नवन्यास बदलौकिकाची भीति दाखवून आपल्या कह्यांत ठेवू पाहतात, व पसंगविशेष त्यानें तोंडावाटे ब्र काढला कीं, ह्या शेजारच्या घरी रुसून जाऊन जगास तमाशा दाखविण्यास कमी करीत नाहींत. असा फाजीलपणाचा प्रकार ने घडण्यास, नव-याने बायकोस आपल्या करड्या स्वभावाची पुरी ओळख पूर्वीपासूनच करून देत गेले पाहिजे. ज्या बायकोस रुसून घराबाहेर जाण्याच्या बागुलबोवास आपला नवरा भिणार नाहीं, वे एकदां आपलें पाऊल घराबाहेर पडलें कीं, पुन्हा दुसरा जन्म घेतला तरी, तें तो परत घरांत घालू देणार नाहीं, अशी बालंबाल खात्री असेल, ती बायको असल ढंग काय करणार आहे ? सारांश बायकांस पहिल्यापासूनच जितक्यास तितक्या ठेविल्या पाहिजेत.आपण ह्मणे तसे आपलें मान्य होईलच, किंवा आपण जो हेका धरू, तो खातरीने सिद्धीस जाईलच, याचा भरंवसा त्यांस वाटू न दिला, झणजे त्याही मजीचा कल पाहून वागू लागतात. असे धोरण न ठेविलें तर आनेदीबाई पुढे राघोबादादांचे कांहींएक न चालतां जसा महाप्रलय झाला, तसा प्रलय होण्याचा प्रसंग येतो. यास्तव स्त्रीजातीच्या ठायीं सामान्यत्वाने राहणारे दुर्गुण मनात
पान:व्यवहारपद्धति.pdf/211
Appearance