६ वें. ] कौटुंबिक विचार. २०१ सांप्रत स्त्रिया पुरुषांचा मान, ' आहो जाहो' इत्यादि बहुवचनी शब्दप्रयोगांनी केवळ शिष्टाचारार्थ मात्र राखतात. असे होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यांत एकदोन फार महत्वाची व विचारणीय आहेत. त्या विषयी पोक्त विचार केला असतां, ह्या बेबंदशाहीचा प्रतिबंध इच्छा असल्यास ज्यास त्यास आपल्या स्थित्यनुरूप करितां येईल. पहिलें व सर्वांत मोठे कारण सटले झणजे, या देशांत पाश्चिमात्य लोकांची पायव व राजसत्ता वाढल्यापासून आमच्या तरुण नोकरमान्यांस त्या लोकांतलें दिखाऊ व शिष्टसांप्रदायिक बायकांचे स्तोम व आजेव खरे भासले. आपल्या लोकांत लग्नकार्याच्या मिरवणुकीत स्त्रियांचे अग्रेसरत्व जसे लौकिकी व औपचारिक आहे, त्याप्रमाणेच त्या लोकांतही स्त्रियांचे लौकिकांत दिसणारे वर्चस्व पुष्कळ अंशीं औपचारिकच आहे. व जें थोडेसे खरे आहे, ते त्या लोकांच्या तेजस्वितेमुळे व स्त्रियांच्या सुशिक्षितपणामुळे त्यांस फारसे बाधकही होत नाही. परंतु हा विचार मनांत न आणतां आमच्या तरुण नोकरमान्यांनी आपल्या स्त्रियांस सुशिक्षित करण्यापूर्वीच वाजवीपेक्षा फाजील स्वातंत्र्य दिले, व त्यांच्या अरेरावी वर्तनाकडे दुर्लक्ष केलें, व तो प्रघात उत्तरोत्तर बळावत जाऊन सांगत बाधक होऊन बसला.
पान:व्यवहारपद्धति.pdf/210
Appearance