Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. अभिवृद्धीस कारणीभूत आहे, त्यास क्षय तरी कसे सणावे ? विचारदृष्टीने पाहिले तर ती अभिवृद्धीच समजली पाहिजे. पण इतकी विवेकबुद्धि व दूरदृष्टि सर्वजनसमुदायास असणे शक्य नाही. यामुळे सर्वकालीं बहुतेक लोक किंबहुना सर्व लोक, थोड्या फार मानाने अनीतीने आपली अभिवृद्धि करण्यास प्रवृत्त झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते; तथापि ज्या देशांत व ज्या कालांत में नीतिनिर्बधाचे शैथिल्य कमी, तो देश व तो काल चांगला; व ज्या देशांत व ज्या कालांत हे शैथिल्य फार, तो देश व तो काल वाईट; कारण देशाची भरभराट व सुख ह्या गोष्टी त्या देशाचा ऋष्यादि व्यवहार व व्यापार यांवर अवलंबून असतात, व तो व्यवहार आणि व्यापारही पाहू गेले तर विद्या, कला व नीति यांवर अवलंबून असतो, व त्यावर लोकांची उपजीविका चालते. देशांतील सत्य व प्रामाणिकपणा समूळ नष्ट व १ कृषिगोरक्ष्यवाणिज्यमिहलोकस्य जीवन । दण्डनीतिखयीविद्या नेन लोको भवत्युत ।। २४ ।। वनपर्व, अ० २०७. |पण्याकरवणिज्याभिः कुष्यागोजाविपोषणैः । वार्तया धार्यते सर्व धर्मरेतैर्द्विजातिभिः ।। ३० ॥ वनपर्व, अ० १५०. २ त्रयी वातदण्डनीति स्तिस्रोविद्या विजानताम् । ताभिः सम्यप्रयुक्ताभिर्लोकयात्रा विधीयते ।। ३१ ।।।