Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ व्यवहारपद्धति. [ प्रकरण केवळ दुस-याच्या मेहनतीचा कृतघ्पणाने केलेला लाजिरवाणा अपहार होय. पण असा लाजिरवाणा आयता फायदा समाजांतील पुष्कळ लोक मिळवू पाहतील, तर कामसू व अंगचोर, अथवा विचारी व अविचारी, असे सारे लोक त्या फायद्यास अंतरतील. उदाहरण, एखाद्या कुटुंबांत एखादा वेडा किंवा आऋशी मनुष्य संसाराच्या कामी उपयोगी पडत नसला, तरी बाकीच्या इतर मनुष्यांच्या संसारदक्षतेमुळे त्याचे कांहीं कमी पडणार नाहीं; पण जर त्या कुटुंबांतील बहुतेक माणसे वेडगळ समजुतीनें कांहीं - एक करीत नाहीशी झाली, व एक मनुष्य मात्र मेरेमरे त कष्ट करीत राहिला, तर त्या विचा-यास हा वेड्यांचा बाजार पोसावा लागल्यामुळे सा-यांबरोबर उपाशीं अरावें लागेल. सांप्रतची आमच्या देशाची अशीच स्थिति आहे. आमच्या समाजांतील बहुतेक लोक देशहिताच्या कामी अंतर्यामापासून उदासीन असून फक्त दांभिकपणाने बाहेरून मात्र उगाच कळकळ दाखवितात, व शरत्कालच्या मेघाप्रमाणे पोकळ गर्जना मात्र करितात, व कांहीं थोडे महात्मे पुरुष मात्र ख-या कळकळीने रात्रदिवस जिवापाड परिश्रम करून हाडे झिजवितात, त्यांस