Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

li ५ वें. ] देशहित विचार. १६१ णाच्या फायद्यांची अयत्नसिद्धि, यांमध्ये जमीनअस्मानचे अंतर आहे. प्राण्यांचे पोषण व्हावे ह्मणून परमेश्वराने सूर्य निर्माण केला आहे, व त्याच्या उद्देशाप्रमाणे प्राण्यांचे पोषण अबाधितपणे होत आहे. सूर्यापासून होणा-या फायद्यांचे महत्व लोकांस न वाटले, तरी त्यांच्या अज्ञानाने परमेश्वराच्या संकल्पास बाध येत नाहीं. कारण, तो मनुष्याच्या अज्ञानाने बाधित होण्याइतका दुर्बल नाहीं. परंतु लोकसमाजापासून होणा-या फायद्यांची गोष्ट तशी नाहीं. लोकसमाज हा विवक्षित फायद्यांचा उद्देश मनांत बाळगून मनुष्यांनी निर्माण केला आहे. यास्तव त्या समाजातील लोकांस ज्या मानाने मूळच्या उद्देशाचा विसर पडेल, किंवा त्यांच्या हातून ज्या मानाने मूळचा उद्देश सिद्धीस नेण्याची हेळसांड होईल, त्या मानाने उद्दिष्ट फायद्यांचे मान कमी होईल, हे उघड आहे. । आतां येवढी गोष्ट खरी आहे की, समाजांतील काह थोड्या लोकांनी मूळच्या उद्देशांची ओळख न ठेवितां, किंवा ते उद्देश सिद्धीस नेण्यास जाणूनबुजून हयगय केली असतांही, अशा अविचारी व कृतघ्र लोकांस इतरांच्या कार्यतत्परतेचा व परिश्रमाचा फायदा यत्नावांचून मिळतो, पण ती कांहीं नैसर्गिक अयत्नसिद्धि नव्हे. तो