१५४ व्यवहारपद्धति. [ प्रकरण च्याही प्रकारचे देशहिताचे कार्य पार पडत नाही, याचे मुख्य कारण हेच आहे. सध्या आमच्या लोकांत को • णाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं. व. एकाचा विचार दुस-याच्या विचाराशी कधीही जुळावयाचा नाहीं. एक पायाने चालावे ह्मणाला; तर दुसरा ह्मणतो, काय ही अविचाराची गोष्ट सांगतां, डोक्यापेक्षां पाय मृदु व मांसल आहेत, त्यामुळे त्यांस खडाकांटा रुतून डोक्यापेक्षा जास्त पीडा होण्याचा संभव आहे. डोक्याची कवटी परमेश्वराने हाडकाची मुद्दाम कठिण केली आहे, ती केवळ निष्कारण हवेत तरंगत राहण्याकरितां केली आहे की काय ? तिचा हेतु मनुष्याने डोक्याने चालावे हा स्पष्ट दिसत असतां, तुह्मी गतानुगतिक बनून पायाने चालतां, हे मला बरोबर दिसत नाहीं. आपणास बरे वाईट कळत नव्हते, तोपर्यंत आपण पुरातन चालीप्रमाणे पायाने चालत आलों, परंतु आतां आपणास विचार करण्याचे सामर्थ्य आले असूनही आपण डोक्याने चालावयास लागू नये, हे आपल्या मूर्खपणाचे दर्शक आहे. तिसरा म्हणतो, गतानुगतिक बनून न राहतां आपणास पुरातन चालींत थोडीशी सुधारणा केली पाहिजे, एवढी गोष्ट मात्र मजला मान्य आहे, तथापि जुन्या
पान:व्यवहारपद्धति.pdf/165
Appearance