देशहित विचार. १५३ सावी, आणि तेथील लोकांचे विचारसामर्थ्य व शारीरसामर्थ्य अगदीं क्षीण झाले असावे, असे बिनदिक्कत अनुमान करितां येते. या गोष्टीची सत्यता आज आमच्या देशाच्या स्थितींतहि स्पष्ट दिसून येते. वर्तनाचे प्रवर्तकत्व जरी विचारशक्तीकडे असते, तरी ते केवळ साक्षात् नसते; सदाचारपद्धतीच्या द्वारें परंपरेनें असते, हे कोणाच्याही ध्यानी येण्यासारखे आहे. कोणत्याही देशांत झालें तरी सारा लोकसमुदाय तत्ववेत्ता असतो असें नाहीं. कोठेही झाले तरी असे तत्वदर्शी फार थोडे असतात, व ते ज्या वर्तनाचा प्रघात लोकांत सुरू करितात, तो प्रघात दीर्घ कालपर्यंत हितावहच होत आहे, असे जेव्हा लोकांच्या अनुभवास येते, तेव्हां तो प्ररूढ होऊन त्यास शिष्टाचारत्व येते, आणि मग ते एक, धर्माचे अंग बनते. व तसे झाल्यावर साधारण लोकांच्या वागणुकीची मोड त्या आचारधर्मावर पडत असते. सर्वांच्या वागणुकीचे धोरण एकसारखे असले झणजे, सर्वांस जी उद्दिष्ट गोष्ट असते, ती कितीही कठिण असली तरी जमातीच्या जोरावर तडीस जाते, पण देशांतील लोकांचे तसे एक धोरण नसले तर त्यांच्या हातून क्षुल्लक गोष्टही पार पडत नाहीं. सांपत आमच्या हातून हलकें अगर भारी कोण
पान:व्यवहारपद्धति.pdf/164
Appearance