In the World of Corporate Managers ची पहिली आवृत्ती प्रसिद्ध होताच त्याच्या मराठी रूपान्तराची मागणी येऊ लागली. प्रकाश आल्मेडांनी पुढाकार घेऊन भाषांतरही केले. त्यानंतर माझ्या पहिल्या इंग्रजी पुस्तकाचे (In the Wonderland of Indian Managers) संपादक किशोर आरस आणि त्यांचे मित्र कृष्णा करवार यांनी मदत करायचे कबूल केले आणि ही मराठी आवृत्ती मार्गी लागली.
व्यवस्थापनाच्या क्षेत्रात इंग्रजी लिखाणाचा धबधबा येतो आहे-परंतु मराठी लिखाण फारसे नाही. या पुस्तकामुळे मराठी वाचकांची सोय होईल ही एक आशा.
इंग्रजी पुस्तकाच्या दहा हजार प्रती वर्षभराच्या आत विकल्या गेल्या. मराठी आवृत्तीला तशाच तऱ्हेची दाद मिळेल ही दुसरी आशा.
आणि त्यामुळे प्रोत्साहित होऊन माझ्या पहिल्या पुस्तकाची व इतर लिखाणाची मराठी आवृत्ती यथावकाश प्रसिद्ध होईल ही तिसरी आशा.
–शरू रांगणेकर
पहिली आवृत्ती तीनच महिन्यांत संपली. तेव्हा वाचकांनी एक आशा तर ताबडतोब पूर्ण केली. आता उरलेल्या दोन आशी केव्हा पूर्ण होतात याची वाट पाहत आहे.
---शरू रांगणेकर