हे पान प्रमाणित केलेले आहे.
संघभावनेची जोपासना
४१
निष्कर्ष
परिणामकारक संघटनेमध्ये खालील बाबी असतात :
० विविध विभागागणिक लढाया आणि व्यवस्थापकांमध्ये - विशेषतः वरिष्ठ
पातळीवरील - झगडे कमीत कमी होतात.
० सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकापासून ते सर्वात खालच्या स्तरावरील कामगारापर्यंत
सर्वत्र स्वकर्तव्याविषयीची जाणीव असते.
० व्यवस्थापकाला संघटनेतील लोकांची चिंता असते - त्यांच्या कामगिरीविषयी,
संभाव्य कार्यशक्ती आणि संधीविषयी.
० शक्य तितक्या थेटपणे, प्रत्यक्षपणे संघटनेतील लोक एकत्र बसून समस्या
सोडवितात.
❋❋❋