पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

मानव सारखे आहेत, कोणी कोणापुढे वाकण्याचे कारण नाही असे त्यांचे मत होते. यामुळे त्यांना शिक्षा होत, मार खावा लागे, फटके खावे लागत. सभेतहि गुंड लोक त्यांच्यावर हल्ले चढवीत व त्यांना रक्तबंबाळ करीत. पण क्वेकर हे शांततावादी, अहिंसावादी, सत्याग्रही होते. त्यांनी शत्रूंवर कधीही हात उचलला नाही. पण त्यांच्या अन्यायावर भडिमार करण्याचे व्रतही त्यांनी कधी सोडले नाही. सभेत लाठ्याकाठ्यांच्या माराने डोके फुटल्यावरहि जॉर्ज तसाच उठे, रक्त पुसून पुन्हा भाषणास सुरुवात करी. गुंडावर खटले भरावे असे त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले; पण तो म्हणाला, 'परमेश्वराने क्षमेचे व्रत स्वीकारले असताना मी ते मोडणे उचित नाही. मी बुद्धीच्या शस्त्राने लढणार आहे. इतर शस्त्रे मला त्याज्य वाटतात.' त्यावेळी अमेरिकेतहि त्याला अनुयायी मिळाले होते. तेथे त्यांचा अनन्वित छळ होत होता. ते ऐकताच तो एका साध्या फुटक्या नावेतून अमेरिकेला गेला. क्वेकरांना तेथे सहज उचलून फाशी देत असत. त्यांना कोणी कपभर दूध दिले तर तेवढ्यावरून देणाऱ्याला तुरुंगात टाकीत. तीन क्वेकर स्त्रियांना गाडीला बांधून बर्फाच्या रस्त्यातून फरफटत नेण्याची शिक्षा अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय दर चौकात त्यांना दहा-दहा फटकेही मारले. अशा या जळत्या खाईत जॉर्ज फॉक्स गेला. आणि स्वतःच्या अनुयायांना त्याने धीर दिला. त्यांचा छळ कमी झाला नाही. पण तो सोसण्यास याच्या शब्दामुळे तेथील क्वेकरांना धीर आला. आणि केवळ क्वेकर पंथ स्वीकारल्यामुळे जेथे इतका अमानुष छळ भोगावा लागे त्या अमेरिकेत १६७० साली जॉर्ज फॉक्सने निग्रो गुलामांच्या बंधमुक्ततेचा जाहीरनामा काढला. हे धाडस, ही निर्भयता खरोखर अतुल आहे. ही निर्भयता, हे नीतिधैर्य काही एक-दोन नेत्यांतच होते असे नाही. संचारार्थ बाहेर पडल्यापासून ८-१० वर्षांतच फॉक्सला ५०,००० अनुयायी निळाले. आणि पुढे हा पंथ वाढतच गेला. येवढ्या लोकाच्या ठायी हे धैर्य कोठून आले ? जिवंतपणीच रौरव यातना सोसण्याचे त्यांना सामर्थ्य कसे प्राप्त झाले ? त्यांच्या जाज्वल्य धर्मानिष्ठेमुळे ! दीनदलितांना पाहून त्यांच्या चित्तात जे कारुण्य निर्माण झाले त्यामुळे. कार्लाइलने आपल्या 'सॉर्टर रिसार्टस' या ग्रंथात पुढील शब्दांत जॉर्ज फॉक्सचे वर्णन केले आहे. "इतिहासकार ऑस्टरलिझ् किंवा वॉटर्लू असल्या लढायांना महत्त्व देतात. पण जॉर्ज फॉक्सचा क्वेकर पंथ

 वै. सा. ... २