पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
वैयक्तिक व सामाजिक

अमेरिकेच्या आदर्शामुळे स्फूर्ती व शक्तीही प्राप्त होईल. म्हणून शाळांनी व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्याकडून हा अभ्यास करविण्याच्या योजना आखाव्या आणि स्वातंत्र्यप्रेम, निर्भयवृत्ती, राष्ट्रनिष्ठा, वास्तवाची अभिरुची इ. गुणांचे त्यांच्या मनात बीजारोपण करून जुन्या पिढीच्या मनाचे पोषण वाघिणीच्या दुधावर जसे झाले तसेच याही पिढीचे करण्याचे श्रेय घ्यावे.