पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११
प्रस्तावना

त्यांचे एतद् विषयक विचार 'समाजकारणाची बचावती ढाल' या लेखात मांडले आहेत.
 अशा रीतीने आरंभी संगीतल्याप्रमाणे वैयक्तिक आणि सामाजिक याविषयीची अनेक तत्त्वे, अनेक सिद्धान्त व अनेक वाद यांचा परामर्श या निबंधसंग्रहात घेतलेला आहे. तरुण वाचकांनी या तत्त्वांचा मूळ ग्रंथापर्यंत जाऊन कसून अभ्यास केला तर ते त्यांच्या मनोविकासाच्या दृष्टीने व भारताच्या लोकशाहीच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत हितावह होईल.

२५- ८- ६३
पु. ग. सहस्रबुद्धे