पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ वैदिक तत्त्वमीमांसा दृष्टीला येऊन पोहोंचलों. आणि शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांकडे पाहण्याची ही दुसरी दृष्टि अशी की, ते ग्रंथ उपनिषदें, ब्रह्मसूत्रे, व गीता या ग्रंथांवरील भाष्ये आहेत, ही गोष्ट अगदी एकीकडे ठेवून किंवा विस• रून, त्या भाष्यरूप ग्रंथांमध्ये कोणत्या मतांचे प्रतिपादन केलेले आहे व कोणत्या मतांचे खंडन केलेले आहे, एवढ्याच गोष्टीविषयी विवेचन करणे. आणि या निबंधाच्या प्रस्तुत भागांत शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या भाष्यरूप ग्रंथांचे जे अल्प विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे, तो । या दुस-या दृष्टीने केला आहे. आणि ह्मणून वाचकांना । अशी विनंती आहे की, त्यांनी देखील वरील दोहोंपैकी पहिली दृष्टिं क्षणभर एकीकडे ठेवून, लेखकाबरोबर दुस-या दृष्टीने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या ग्रंथांचे अवलो कन करण्याची कृपा करावी. तर शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या, किंवा त्यांना मान्य अशा, मतांसंबंधानें कांहीं विवेचन या लेखांत । करावयाचे आहे. आतां ही गोष्ट प्रसिद्धच आहे की, रामानुजाचार्य शंकराचार्यांच्या मागून होऊन गेले, व । त्यांना शंकराचार्यांची मते मान्य नव्हतीं. ह्मणजे शंकराचार्यांनी प्रतिपादित जी मते त्यांना श्रुतिस्मृतींचा आधार नाही, किंबहुना ती श्रुतिस्मृतींच्या विरुद्ध आणि ह्मणून ।