पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य असत्य व त्याज्य आहेत, असे रामानुजाचार्यांनी प्रतिपादन केले आहे. रामानुजाचार्यांच्या प्रसिद्ध ग्रंथांपैकी जो मुख्य झणजे श्रीभाष्य, त्यांच्या आरंभीच एक पूर्वपक्ष विस्तरशः निर्दिष्ट करून, त्या पूर्वपक्षाचे निरसन करण्याला आरंभ करण्यापूर्वी त्या पक्षाचे प्रतिपादन करणारा संबंधाने रामानुजाचार्यांनी पुढील उल्लेख केला आहेःतत् इदं औपनिषद-परमपुरुष-वरणीयता-हेतु-गुणविशेषविरहिणां, अनादि-पापवासना–दूषित-अशेष-शेमुषीकाणां, अनाधिगत-पद-वाक्य-स्वरूप तदर्थयाथात्म्य-प्रत्यक्षादिसकलप्रमाणवृत्त-तत्-तत्-इतिकर्तव्यतारूप-समीचीनन्यायमागणां, विकल्प-असह–विविध-कुतर्क-कल्क-क- पितं, इति न्याय–अनुगृहीत-वाक्यप्रत्यक्षादि सकल-प्रमा णवृत्त याथात्म्यविद्भिः अनादरणीयम् ॥ सैणजे, उपनिषदांमध्ये ज्या परम पुरुषाचे वर्णन केलेले आहे त्याने आपला अंगिकार करावा' एतदर्थ जे गुण आपल्या अंगी असले पाहिजेत ते गुण ज्यांच्या अंगीं नाहींत; अनादि पापवासनांनी ज्यांची बुद्धि सर्वशः दूषित झालेली आहे; शब्द व वाक्ये यांचे खरे स्वरूप व खरा अर्थ, तसेच प्रत्यक्षादि सर्व प्रमाणांच्या योगाने सिद्ध झालेले अतएव निर्दोष असे न्यायशास्त्राचे नियम, या सर्व गोष्टींविषयीं ज्यांना पूर्ण अज्ञान आहे, अशा मनुष्यांचे हे मत नाना कुतर्क व मोह यांच्या वर स्थापन