पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ वैदिक तत्त्वमीमांसा मुळे ( घटाचे निमित्तकारण जौ ) कुंभार (तो) मृत्तिकेचे नियमन करितो, त्या प्रमाणेच जगाचे निमित्तकारण जो पशुपति (ह्मणजे ईश्वर) तो प्रधानाचे नियमन करितो असें ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण आपला अनुभव असाच आहे कीं, कुंभार वगैरे जें मृत्तिका वगैरे द्रव्यांचे नियमन करितात ते ते शरीरयुक्त असल्या मुळे करितात. परंतु ईश्वर शरीरयुक्त आहे असे मानणे सयुक्तिक नव्हे. आतां या संबंधाने पशुपतिवादी कदाचित् असे ह्मणेल की, ज्या प्रमाणे सुखदुःख अनुभविणारा असा जो जीवात्मा तो शरीररहित असून देखील इंद्रियें व शरीर यांचे नियमन । करितो; त्या प्रमाणेच ईश्वर शरीररहित असला तरी तो प्रधानाचे नियमन करू शकेल. परंतु हे सणणे देखील बरोबर नव्हे. कारण, जीवात्मा शरीराचे व इंद्रियांचे नियमन करतो ते, त्याने केलेलीं जी चांगली किंवा वाईट कमें त्यांचे फळ अनुभविण्या करितां, या कृत्यां पासून उत्पन्न झालेलें जें अदृष्ट त्या अदृष्टाच्या योगानें करितो. या कारतां पशुपतिवादीला असे मानावे लागेल कीं, ईश्वर देखील पापपुण्यरूप अदृष्टाने बद्ध असून त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांचे फळ अनुभवावे लागते. अर्थातच, ज्या प्रमाणे जीवात्मा शरीराचे नियमन करितो त्या प्रमाणे ईश्वर प्रधानाचे नियमन करितो, असे ह्मणतां येत नाही. दुसरे असें कीं, ईश्वर अदृष्टाने बद्ध आहे असे जर मानले, तर असे देखील मानावे लागेल की, जीवात्म्या प्रमाणेच ईश्वर जन्ममरणाने बद्ध असून तो सर्वज्ञ नाहीं. सारांश, हा पशुपतिवाद सर्वथैव त्याज्य होय. '