पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८९ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ज्या सिद्धांतां संबंधाने शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या मध्ये निश्चितपणे व स्पष्टपणे मतैक्य आहे, अशा वैदिक तत्त्वमीमांसेच्या सिद्धांतांचे या निबंधाच्या प्रस्तुत भागांत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक अडचणींचा परिहार होऊन जर या निबंधाचा दुसरा ( रामानुजाचार्य विरुद्ध शंकराचार्य नामक ) भाग तयार करून प्रसिद्ध करण्याचा सुयोग आला तर त्या भागांत प्रथम या भागांतील विवेचनाचा उपसंहार केला जाऊन, नंतर ( लौकिक समजुती प्रमाणे ) रामानुजाचायनीं शंकराचार्यांच्या अद्वैता विरुद्ध आणिलेले जे आक्षेप आहेत ते निर्दिष्ट केले जातील; व शेवटी ते आक्षेप साधार किंवा न्याय्य आहेत किंवा नाहींत या विषयीं निर्णय करण्याचा प्रयत्न केला जाईल,