पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३७७: आत्मगतस्य च अदृष्टस्य परमाणु-गत-कर्म-उत्पात्तहेतुत्वं न संभवति । अथ अदृष्टवत्-आत्म-संयोगात् अणुषु कर्म-उत्पात्तः, तदा तस्य अदृष्ट-प्रवाहस्य नित्यत्वेन नित्य-सर्ग-प्रसंगः । ननु अदृष्टं विपाक-अपेक्षं फलाय अलम् । कानिचित् अदृष्टानि तदानीं एवं विपच्यन्ते। कानिचित् जन्मान्तरे, कानिचित् कल्पान्तरे । अतः विपाकअपेक्षत्वात् न सर्वदा उत्पादकत्व-प्रसंगः इति । न एतत् । अनन्तैः आत्मभिः असंकेत–पूर्वकं अयुगपत् अनुष्ठित अनेक-विविध-कर्म-जनितानां अदृष्टानां एकस्मिन् काले एकरूप-विपाकस्य अप्रामाणिकत्वात् । अतःः एव युगपत् । सर्व-संहारः द्वि-परार्ध-कालं अविषाकेनः अवस्थानं च न संगच्छते ।....अतः जगत्-उत्पत्तेः अणु-गत-कर्मपूर्वकत्व-अभावः ॥ ( श्रीभाष्य, २।२।११ ) ह्मणजे, या संबंधाने असा प्रश्न उत्पन्न होतो की, ज्या अदृष्टाच्या योगाने परमाणू मध्ये मूळ गति उत्पन्न होते, ते अदृष्ठ प्रमाणूंशीं संबद्ध असते किंवा जीवात्म्याशी संबद्ध असते ? आणि यां। प्रश्नाला कोणतेही उत्तर मिळाले, तरी त्याच्या योगाने परमाणुवाद सिद्ध होत नाहीं. कारण, एकतर, जीवात्म्याच्या पुण्याचरणां पासून किंवा पापाचरणा पासून उत्पन्न होणारे जे अदृष्ट तें परमाणूशी संबद्ध असणे शक्य नाही. परंतु ते परमाणूंशीं संबद्ध असते असे जर गृहीत धरिलें, तर असे देखील मानावे लागेल की, नेहमी जगाची उत्पत्तिच होत असते. ( परंतु असे असेल तर त्या मुळे प्रळयकाळ अशक्य होईल. ) उलट पक्षीं, अदृष्ट ( परमाणूंशीं संबद्ध नसून ) जीवात्म्याशीं संबद्ध असते. असे जर मानिले, तर