पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७४ वैदिक तत्त्वमीमांसा, अपि अंशेन परिगृहीतः, इति अत्यन्तं एव अनादरणीयः वेदवादिभिः ।....तत् एवं असारतर-तर्क-संदृब्धत्वात , ईश्वर-कारण-श्रुति–विरुद्धत्वात् , श्रुति-प्रवणैः च शिष्टैः। मन्वादिभिः अपरिगृहीतत्वात्, अत्यन्तं एव अनपेक्षा अस्मिन् परमाणु-कारण-वादे कार्या श्रेयः-अर्थभिः ।। (शारीरकभाष्य, २॥२॥१७) झणजे, * कार्य उत्पन्न होण्या पूर्वी ते कारणा मध्ये विद्यमान असते, हा आणि दुसरे कांहीं सिद्धांत प्रधानवादा मध्ये प्रतिपादन केलेले असल्या मुळे तेवढ्या पुरता प्रधानवाद मनु वगैरे कांहीं वेदांतवादींनी मान्य केला आहे. परंतु हा परमाणुवाद कोणीही शिष्टांनी किंचित् अंशाने देखील मान्य केलेला नाही. अर्थातच, वेदांतवादींनीं तो सर्वथैवअग्राह्यच मानिला पाहिजे. ज्या विचारसरणीनें परमाणु कारणवादाचे प्रतिपादन केले जाते। ती विचारसरणी असयुक्तिक आहे; जगाचे कारण ईश्वर असे श्रुति मध्ये निरूपण केलेले असल्या मुळे तो वाद श्रुतीच्या विरुद्ध आहे; आणि श्रुती मध्ये जो अत्यंत प्रवीण अशा मनूने किंवा दुस-या कोणीही या परमाणु कारणवादाचे ग्रहण केलेले नाहीं; या सर्व कारणां सुळे, आपणांला परमार्थप्राप्ति व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल, त्यांनीं । या परमाणु कारणवादा कडे सर्वथैव दुर्लक्ष केले पाहिजे.' या परमाणु कारणवादा संबंधानें रामानुजाचार्यांचे मत असे:-तत् इदं परमाणु-गतं कर्म स्वगत-अदृष्ट-कारितं, आत्मगत-अदृष्ट-कारितं वा । उभयथा अपि न संभवति । क्षेत्रज्ञ-पुण्य-पाप-अनुष्ठान-जनितस्य अदृष्टस्य परमाणुगतत्व-असंभवात्, संभवे च सर्वदा उत्पादकत्व-प्रसंगः ।