पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३२७ तथा सर्वे एव बाह्य-आध्यात्मिकाः भेदाः सुख-दुःख-मोहआत्मतया अन्वीयमानाः, सुख-दुःख - मोह-आत्मक-सा- मान्य-पूर्वकाः भवतुं अर्हन्ति । यत् तत् सुख-दुःखमोह-आत्मकं सामान्यं, तत् त्रिगुणं प्रधानं मृद्वत्-अचेतनं चेतनस्य पुरुषस्य अर्थ साधयितुं स्वभावेन एव विचित्रेण विकार-आत्मना विवर्तते इति । तथा परिमाणादिभिः अपि लिंगैः तत् एव प्रधानं अनुमिमते ॥ ( शारीरकभाष्य, २॥ २।१ ) ह्मणजे, * सांख्य असे प्रतिपादन करितात की, नेहमी आपल्या अनुभवाला येणा-या ज्या घट शराव (ताटें) इत्यादि भिन्न वस्तु, त्या स्वभावतः मृत्तिकेने बनलेल्या असून मृत्तिका हे त्या सर्वांचे साधारण कारण आहे असे दिसून येते; त्या प्रमाणेच, सुख दुःख मोह यांच्या योगाने स्वभावतः बनलेल्या ज्या बाह्य व अंतस्थ भिन्न भिन्न वस्तु त्या, ज्याचा स्वभाव सुख-दुःख-मोहरूप आहे, अशा प्रकारच्या कारणा पासूनच उत्पन्न झालेल्या असल्या पाहिजेत. आणि सुख-दुःख-मोह–स्वभाव हे त्या सर्वांचे साधारण कारण ह्मणजे, सत्त्वगुण रजोगुण व तमोगुण, या तीन द्रव्यांच्या योगाने बनलेलें जें प्रधान तें. हे प्रधान मृत्तिके प्रमाणे स्वतः अचेतन असून, चैतन्ययुक्त जो जीवात्मा त्याचे हेतु साधण्या करितां नाना प्रकारच्या विकारांच्या रूपाने स्वभावतःच व्यक्त होते. परिमितता वगैरे जे विकारांचे धर्म त्यांच्या योगाने देखील त्याच प्रधाना विषयीं अनुमत होते. (१) कार्ये अचेतनं दृष्ट्वा तत्-कारणं अपि तादृक् एव अनुमेयं इति आह- मृद्वत्' इति ॥ ( आनंदगिरि ) । (२) अर्थशब्दः भोग–अपवर्ग–अर्थः॥ ( आनंदगिरि )