पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ वैदिक तत्त्वमीमांसा उत्पन्न होते, आणि त्या मध्येच लय पावते. अर्थात् , प्रधान हे सर्व जगाचे मूळ कारण असे सिद्ध झाले. कारण सत्त्वगुण रजोगुण व तमोगुण यांच्या पासून उत्पन्न होणारे जे सुख दुःख मोह एतद्रूप धर्म, त्यांनी भरलेलें जें हैं जग त्याचा स्वभाव, आणि ल्या तीन गुणांच्या साम्यावस्थेने बनलेलें जें प्रधान त्याचा स्वभाव, हे दोन्ही एकरूप असल्या मुळे प्रधानच त्याचे (ह्मणजे जगाचे) कारण असले पाहिजे. ज्या प्रमाणे घट मृत्तिकेच्या योगाने बनलेला असल्या मुळे मृदूप जें द्रव्य तेच त्याचे ( ह्मणजे घटाचे ) कारण असले पाहिजे, कारण घट उत्पन्न होण्याला आवश्यक लागणारी अशी जी शक्ति व जी प्रकृति ती मृत्तिके मध्ये मात्र असते; त्या प्रमाणेच, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांच्या साम्यावस्थर्न बनलेले असून, देशाच्या व काळाच्या मानाने अमयाद असे जे प्रधान तेंच,-महत् अहंकार तन्मात्रा इत्यादि। जे भेद ते मर्यादित असल्या मुळे,-त्यांचे कारण असे सिद्ध हात. कारण महत् वगैरे ( वटा प्रमाणे ) परिमित असल्या मुळे त्यांच्या योगाने सर्व जग उत्पन्न होणे शक्य नाहीं. या वरून असे सिद्ध झालें कीं, तीन गुणांच्या साम्यावेस्थेने बनलेलें जें प्रधान तेच एक, त्याच तीन गुणांच्या योगाने बनलेलें जें जग, त्या जगाचे कारण. ' - शंकराचार्यांच्या भाषेनें हैं सांख्यमत असेः-तत्र सांख्याः मन्यन्ते । यथा घट-शराव-आदयः भेदाः मृद्-आत्मना अन्वीयमानाः मृद-आत्मक- सामान्यपूर्वकाः लोके दृष्टाः । (१) ये यत्-स्वभाव-अन्विताः ते ततु-स्वभाव-वस्तु-प्रकृतिकाः, ( आनंदनि मृद्-स्वभाव-अन्विताः तत्-प्रकृतिकाः इयर्थः ॥ । यथा घटादयः मृ ""