पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० | वैदिक तत्त्वमीम्सा च अनुपलभ्यमानाः, असिद्धे देह-व्यतिरिक्ते धर्मणि देह-धर्माः एव भवितुं अर्हन्ति । तस्मात् अव्यातिरकः देहात् आत्मनः इति ( शारीरकभाष्य, ३।३।५३ ) ह्मणजे, या संबंधाने लोकायतिक नामक देहात्मवादी असे प्रतिपादन करितात की, देह हा जीवात्मा होय, देहाहून भिन्न (ह्मणजे स्वतंत्र) असा जीवात्मा विद्यमान नाहीं. त्यांचे मत असे की, पृथ्वी, उदक, तेज, वायु, आणि आकाश, हीं जीं बाह्य द्रव्ये त्यां पैकी एकेका मध्ये किंवा त्यांच्या समुदाया मध्ये जरी आपणांला चैतन्य दिसत नाहीं; तथापि त्यांचे देहा मध्ये रूपांतर झाले { ह्मणजे त्या द्रव्यांच्या संघाताने देह उत्पन्न झाला । ह्मणजे त्या देहा मध्ये चैतन्य व्यक्त होणे अशक्य नाहीं. अर्थात् , ते या द्रव्यां पासूनच उत्पन्न होते. आणि ते असे देखील ह्मणतात की, ज्या प्रमाणे कांहीं द्रव्यांच्या मिश्नणाच्या योगाने त्यांच्या मध्ये मादकत्व उत्पन्न होते, त्या प्रमाणेच यांच महाभूतांच्या देहरूप संघाताच्या योगार्ने त्यांच्या मध्ये विज्ञान उत्पन्न होते. सारांश, त्यांच्या मतें चैतन्ययुक्त देह ह्माजे जीवात्मा होय. अर्थातच, देहाचा त्याग करून जो स्वर्गा प्रत किंवा मोक्षा प्रत जाऊ शकेल असा देहाहून भिन् ( ह्मणजे स्वतंत्र ) जीवात्मा विद्यमान असून, त्याच्या मुळे देहाला चैतन्य प्राप्त होते असे मानणे हे, या मता प्रमाणे, बरोबर नव्हे. कारण देहच सचेतन असून सचेतन देह ह्मणजेच जीवात्मा. आपलें हैं मत सिद्ध करण्या करित लोकायतिक पुढील अवयु–व्यतिरेकाची योजना करितातः३ ज्याच्या विद्यमानतेच्या वेळी मात्र विद्यमान असते आणि