पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ । वैदिक सत्त्वमीमांसा पुरुषाने ( ह्मणजे ईश्वराने ) जग निर्माण केले, अशी कल्पना करणे, अनुमानादि प्रमाणांच्या दृष्टीने, ठीक नव्हे. परंतु जरी अशी कल्पना केली की, सर्व जगाचा एकच कर्ता, तरी तो कर्ता सर्वज्ञ सर्वशक्ति असलाच पाहिजे असे अनुमानवादीच्या विचारसरणीने सिद्ध होत नाही, असे रामानुजाचार्य ह्मणतातः—न च युगपत् सर्वउच्छिात्तः सर्व-उत्पत्तिः च प्रमाण-पदवीं अधिरोहतः । अदर्शनात् । क्रमण एव उत्पत्ति-विनाश-दर्शनात् च । कार्यत्वेन सर्व-उत्पत्ति-विनाशयोः कल्प्यमानयोः दर्शनआनुगुण्येन कल्पनायां अपि विरोध-अभावात् च । अतः बुद्धिमत्-एक-कर्तृकत्वे साध्ये, कार्यत्वस्य अनैकान्यं, पक्षस्य अप्रसिद्ध-विशेषणत्वं, साध्य–विकलता च दृष्टान्तस्य । सर्व-निर्माण-चतुरस्य एकस्य अप्रसिद्धेः । बुद्धिमत्-कर्तृकत्वमात्रे साध्ये सिद्ध-साधनता ॥ ( श्रीभाष्य, १।१।३) झणजे, “सर्व जग एकाच वेळीं लय पावते किंवा • उत्पन्न होते असे ह्मणण्याला कांहीं आधार नाही. कारण आपणांला तसा अनुभव येत नाही. उलट, आपला अनुभव असा आहे की, ज्या वस्तु उत्पन्न होतात किंवा नष्ट होतात, त्या क्रमशःच उत्पन्न होतात किंवा नष्ट होतात. आणि ज्या अर्थी जग हे कार्य असल्या मुळे तें उत्पन्न होते व नष्ट होते असे मानावयाचे, त्या अर्थी त्याची उत्पत्ति व त्याचा नाश, आपल्या अनुभवाला येणारी जी इतर कार्ये, त्यांच्या उत्पत्ती प्रमाणे व नाशा प्रमाणेच,-ह्मणजे क्रमशः,-होतात असे मानले पाहिजे. आणि तसे मानिलें असतां कोणताही विरोध उत्पन्न