पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १२९ होत नाहीं. सारांश, चित्स्वरूप असा एकच सर्व जगाचा कर्ता आहे, हा सिद्धांत जर सिद्ध करावयाचा असेल तर तो वरील विचारसरणीने सिद्ध होणे शक्य नाही. कारण जग कार्यरूप आहे एवढ्याच वरून ते एकाच कत्र्याचे कार्य असे सिद्ध होत नाही. शिवाय, जगत्कर्याच्या ठिकाणी जे ( सर्वज्ञत्व सर्वशक्तित्व इत्यादि ) धर्म अनुमित करावयाचे आहेत ते, इतर कोणत्याही कार्या पासून अनुमित जो कर्ता, त्याच्या मध्ये विद्यमान असल्या विषयी काहीच माहिती नाही. आणि तिसरे असे की, दुसरा ‘एक देखील असा कोणताही कर्ता आपणांला माहीत नाहीं कीं, जो सर्व विद्यमान वस्तु उत्पन्न करू शकतो. आतां जी गोष्ट अनुमानाने सिद्ध होते असे प्रतिपादन करावयाचे ती जर एवढीच असेल की, ज्या एका कर्त्याने किंवा अनेक कत्यानीं जग उत्पन्न केले, त्याच्या किंवा त्यांच्या मध्ये चेतनत्व होते; तर ते प्रतिपादन करावयाची आवश्यकता नाहीं. कारण ती अनुमानाने सिद्ध करितां येते, असे आह्मी कबूल करितों. अनुमानवादीने योजिलेल्या अनुमानमूलक विचारसरणीत अनुमानमूलकच हे मुख्य, व आणखी कांहीं गौण, दोष दाखवून शेवटीं रामानुजाचार्य ह्मणतातः–अतः दर्शन अनुगुण्येन ईश्वर–अनुमानं दर्शन-आनुगुण्य-पराहतम् ।। ( श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, * प्रत्यक्षादि प्रमाणांना अनुरूप अशी जी ईश्वरा विषयीं अनुमान करण्या करितां अनुमानवादीने योजिलेली विचारसरणी, तिचे त्याच प्रमाणांना अनुरूप अशा रीतीने खंडन करितां येते,