पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ . वैदिक तत्त्वमीमांसा ह्मणणे सयुक्तिक नव्हे. कारण पृथ्वी महासागर वगैरे कार्यरूप आहेत असे जरी कबूल केले, तरी ते सर्व एकाच काळीं एकाच कर्या कडून निर्माण केले गेले, असे मानण्याला कांहींच आधार नाही. तसेच, ज्या प्रमाणे एका घटाचे कार्यत्व एकच असते आणि ह्मणून तो घट एकाच वेळी एकच कर्ता निर्माण करितो; त्या प्रमाणे जर जगातील सर्व वस्तूचे एकच कार्यत्व असते, तर त्या सर्व वस्तु एकाच वेळी एकाच कर्त्याने निर्माण केल्या, असे प्रतिपादन करितां आले असते. परंतु जगांतील सर्व वस्तूंचे एकच कार्यत्व आहे, असे ह्मणण्याला काही आधार नाही. आणि ज्या वस्तूचे कार्यत्व एक नाहीं,-ज्या परस्पर भिन्न कार्ये आहेत, -त्या वस्तु निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या कय कडून निर्माण केल्या जातात, ही गोष्ट अनुभवसिद्ध असल्या मुळे, जगातील सर्व वस्तु एकाच काळी एकाच कर्या कडून निर्माण केल्या गेल्या, असे सिद्ध करण्याला काही नियम नाही' | सारांश, जग सावयव आहे ह्मणून ते कार्य आहे, आणि जग कार्य आहे ह्मणून ते उत्पन्न करणारा कोणी सचेतन कर्ता विद्यमान असला पाहिजे; ही सामान्य विचारसरणी रामानुजाचार्यांना मान्य आहे. परंतु ते असे ह्मणतात की, या विचारसरणीनें, सर्व जगाचा एकच कर्ता असून त्याने हे सर्व जग एकाच काळीं उत्पन्न केले,—आणि ह्मणून तो सर्वज्ञ सर्वशक्ति असला पाहिजे, असे सिद्ध होत नाही, परंतु या संबंधाने अनुमानवादी पक्षाने असे प्रतिपादन केले आहे की, ज्या अर्थी जगाचा कर्ता सचेतन असला पाहिजे, व ज्या अर्थी कोणत्याही जीवात्म्या कडून जग निर्माण केले. जाणे शक्य नाही,