पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १२५ ज्याचा विस्तार अनंत व ज्याची रचना विचित्र, असे जग निर्माण करितो; असा जो ईश्वर त्याचे अस्तित्व अनुमानाच्या योगानेच सिद्ध होते.' जगत्कर्ता जो सर्वज्ञ सर्वशक्ति परमेश्वर, त्याचे अस्तित्व अनुमानाच्या योगाने सिद्ध करण्या करितां अनुमानवादी पक्षाने योजिलेली जी ही विचारसरणी, तिचे रामानुजाचार्यांनी असे खंडन केले आहेः–एवं प्राप्ते ब्रूमः ।.... यत् उक्तं, सावयवत्वादिना कार्य सर्वं जगत् , कार्यं च तत्उचित-कर्तृ-विशेष—पूर्वकं दृष्टं, इति निखिल–जगत्-नि- मण-तत्-उपादान-उपकरण-वेदन-चतुरः कश्चित् अनुमेयः इति । तत् अयुक्तम् । मही–महार्णवादीनां कार्यत्वे अपि, एकदा एव एकेन निर्मिताः इति अत्रे प्रमाण-अभावात् । न च एकस्य घटस्य इव सर्वेषां एक कार्यत्वं, येन एकदा एव एकः कर्ता स्यात् । पृथक्-भूतेषु कार्येषु काल-भेद-कर्तृ-भेद-दर्शनेन, कर्तृ-काल-ऐक्य-नियमअभावात् ।। ( श्रीभाष्य, १।१३ ) ह्मणजे, * या संबंधाने आमचे ह्मणणे असे:-अनुमानवादी असे ह्मणतो की, ज्या अर्थी सर्व जग सावयव असल्या मुळे ते कार्य आहे, व ज्या अर्थी कोणतेही कार्य उत्पन्न होण्या पूर्वी ते कार्य निर्माण करण्याला समर्थ असा कर्ता विद्यमान असला पाहिजे, ही गोष्ट निर्विवाद आहे; त्या अर्थ सर्व जग निर्माण करण्याला, व सर्व जग निर्माण करण्याला आवश्यक अशी जी उपादान-उपकरणे ती प्रत्यक्षतः जा णण्याला, समर्थ असा कोणी कर्ता विद्यमान असला पाहिजे असे अनुमान होते. परंतु (रामानुजाचार्यांच्या मते ) हैं।