पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० वैदिक तत्त्वमीमांसा । शक्ति-संपन्नः एव सिध्यति ॥ ( श्रीभाष्य, १।१।३ ) झणजे, * या संबंधानें कदाचित् असे प्रतिपादन केलें जाईल की, जर जगरूप कार्य उत्पन्न करण्याला कोणी चिदात्मक कर्ता पाहिजे तर, ( ज्याचे अस्तित्व विरुद्ध पक्षाला कबूल नाहीं असा परमेश्वर त्या कार्याचा कर्ता अशी कल्पना करण्या ऐवजी, ) ज्यांचे अस्तित्व दोन्ही पक्षांना मान्य आहे असे जे जीवात्मे त्यांच्या पैकी कोणी जग निर्माण केले, अशी कल्पना करावी. कारण ही कल्पना विरुद्ध पक्षाला अधिक ग्राह्य होईल. परंतु ( अनुमानवादीच्या मते ) ही कल्पना सयुक्तिक नव्हे. कारण आपला अनुभव असा आहे की, ज्या वस्तु सूक्ष्म गूढ किंवा दूर असतात त्या प्रत्यक्षतः जाणण्याची शक्ति जीवात्म्यां मध्यें। असत नाही. आणि कोणत्याही जीवात्म्याच्या शक्ती विषयी जी कल्पना करावयाची ती या अनुभवाला अनुसरूनच केली पाहिजे. परंतु जीवात्म्यां प्रमाणे ही शक्ति ईश्वराच्या ठिकाणी नाहीं असे आपल्या अनुभवाने निश्चित होत नाही. ह्मणून अनुमानादिकांच्या योगाने ईश्वराचे अस्तित्व व सामर्थ्य सिद्ध करितां येणे अशक्य नाही. इतकेच नव्हे, तर कोणतेही कार्य उत्पन्न होण्याला ते कार्य उत्पन्न करण्याला समर्थ असा कर्ता विद्यमान असलाच पाहिजे, या नियमार्ने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध झालें, ह्मणजे मग ईश्वररूप जो जगाचा कर्ता तो स्वभावतःच सर्व वस्तु प्रत्यक्षतः जाणप्याला व त्यांचे नियमन करण्याला समर्थ असलाच घा हिजे असेही सिद्ध होते.