पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ११९ झालेल्या पाहून,-ह्मणजे त्यांच्या मधील कार्यत्व प्रत्यक्षतः पाहून, आपण त्या कार्यत्वा पासून घटादिक वस्तु उत्पन्न करण्याला आवश्यक असे, घटादिकांच्या कन्या मध्ये विद्यमान असणारे, जें सामर्थ्य व ज्ञान, त्या विषयी अनुमान करतो. पण परिचित अशा वस्तुं संबंधाने आपणांला अशीं अनुमाने करितां आलीं, ह्मणजे मग राजवाड्या सारखी एकादि अपरिचित वस्तु व तिची विलक्षण रचना आपल्या दृष्टीला पडली, तर तिच्या अवयवांच्या विशेष रचने पासून ती कार्यरूप आहे. असे प्रथम अनुमान करून, नंतर तिचा कर्ता व त्याचे विलक्षण ज्ञान व सामर्थ्य यांच्या विषयी आपण अनुमान करतो. त्या प्रमाणेच, जग व मनुष्यादि प्राण्यांचे शरीर ही कार्ये आहेत असे एकदा ठरलें, #णजे मग त्या पासून अनुमानाने असे देखील सिद्ध होते की, सर्व वस्तूचे ज्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे व सर्व वस्तु उत्पन्न करण्या सारखें ज्याच्या अंगीं सामर्थ्य आहे, असा विशेष पुरुष विद्यमान असला पाहिजे.' : या प्रमाणे मुख्य सिद्धांताचे अनुमानाच्या योगाने प्रतिपादन करून, अनुमानवादी ह्मणतोः-न च लाघवेन उभयवादि-संप्रतिपक्ष-क्षेत्रज्ञान एव ईदृशं अधिष्ठातृत्वकल्पनं युक्तम् । तेषां सूक्ष्म-व्यवहित-विप्रकृष्ट-दर्शनअशक्ति–निश्चयात् । दर्शन–अनुगुणेन एव हि सर्वत्र शक्ति-कल्पना । न च क्षेत्रज्ञवत् ईश्वरस्य अशक्ति–निश्चयः अस्ति । अतः प्रमाण-अन्तरतः न तत्-सिद्धि-अनुप पत्तिः। समर्थ-कर्तृ-पूर्व कत्व-नियत-कार्यत्व-हेतुना सिध्यनू, स्वाभाविक-सर्व--अर्थ-साक्षात्कार-तत्-नियमन