पान:वेरुळ.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.


 १. कोणत्याही कलाकुसरीच्या कामाकडे दोन दृष्टींनी पहातां येतें;(१) कौशल्याच्या दृष्टीनें व (२) सामाजिक दृष्टीनें कौशल्याच्या दृष्टीने त्या कामाकडे पहातांना त्यांतील सुंदर वळणदार रेखा, प्रमाणबद्ध आकृति, नाजुक नकशी व व्यवस्थित मांडणी व योजना यांचा विचार आपण करतों; आणि त्याच कामाकडे सामाजिक दृष्टीनें आपण पाहू लागलों म्हणजे तें काम कोणी केलें, कधीं केलें, कोणत्या हेतूनें केले व त्यांत दाखविल्या आकृती- वरून त्या चित्र वगैरे काम करणाराचे सामाजिक, राजकीय, औद्योगिक व धार्मिक संबंधांत काय आचार विचार होते, याची आपण चौकशी करतों. असा या दोन दृष्टींनीं केलेल्या विचारांत व पहाणीत भेद आहे.

 २. अशी पहाणी व विचार केल्यावर आपण जी अनुमानें व निर्णय काढतों ते नेहमींच अगदी बरोबर असतात असे जरी नसले तरी ते सामान्यतः बरोबर असण्या- चा पुष्कळ संभव असतो. ज्याप्रमाणे एखादा कवि अगर ग्रंथकार कोणत्याही काळाचें वर्णन करीत असला तरी त्यानें योजलेले शब्द, केलेले वाक्यांचे प्रयोग व उपयोगांत आणलेल्या उपमा वगैरेवरून कवीच्या मनाची व परिस्थितीची आपणांस थोडी फार कल्पना होते. उदाहरणार्थ :- इंग्रजी राज्यापूर्वी आपण शहाजी राजे, अकबर बादशहा, असें म्हणत होतों. पण आतां इंग्रजांच्या सहवासानें राजे अमानुल्ला, केसर वुइलियम असे शब्दप्रयोग इंग्रजी धर्तीचे करूं लागलों व इंग्रजांचा सहवास झालेले आपण आहोत असे दिसूं लागले. त्याचप्रमाणे शिल्पकारानें कोणत्याही काळाचा देखावा दाख- विला तरी त्यांत तो आपल्या मनाची, आपल्या समाजाच्या आचार विचारांची न कळत भर घालीत असतो. हे त्या चित्रकाराचें मर्म लक्ष्यांत घेऊन चित्रांवरून त्या काळच्या समाजाविषयी सामान्य कल्पना होते इतकेंच नव्हें तर बराच बिनचूक अंदाज करता येतो.

 ३. एखाद्या वस्तूचें आपण निव्वळ कला म्हणून निरीक्षण करूं लागलों म्हणजे तिच्यांतील तीन गुणांकडे आपणांस लक्ष्य द्यावें लागतें. (१ तिची मजबुती किंवा टिकाऊपणा, (२) तिची उपयुक्तता किंवा व्यवहारांत उपयोगी पडण्याचें सामर्थ्य व (३) तिचें मनोहारित्व अगर सौंदर्य कला या दृष्टीनें जरी सौंदर्याचें महत्व जास्त .