पान:वेरुळ.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१


बादचा किल्ला दिसेल इतकी उंच ही इमारत बांधण्याचा होता. पण ही महत्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या आधीच त्याला मृत्यूनें गांठलें.

 आख्यायिका अशी आहे कीं, सलाबतजंगापाशी परिस होता आणि त्यास मनास वाटेल तेव्हां हलक्या धातूंचे सोने करता येत असे. परंतु इतक्या कालांतरा- नेही कांहीं गुप्त खजिना त्यापाशीं होता अशी शंका कोणी काढली नाहीं. असा लेख आहे की, जिवाचा कंटाळा येऊन, त्यानें विषाच्या तीन कुप्या तयार केल्या होत्या. एक स्वतःकरितां व दोन त्याच्या दोन बायकांकरितां आणि त्या आपल्या बरोबर मरण पावल्यास त्यांना आपल्या भव्य कवरस्थानांत जागा मिळावी असे त्यानें ठरविले होते.

 धाकट्या स्त्रीचें त्यावर प्रेम होते, तिनें ही गोष्ट कबूल केली; पण दुसरी वडील आणि शहाणी होती, तिनें असला सन्मान आपणास नको म्हणून स्वच्छ सांगितलें.

 तिची कबर अंतरावर बाहेरील उंचवट्यावर आहे. तिजपाशी तिच्या मुलाची व एका कुत्र्याचीही कबर आहे. तिच्या या कृत्याचा निषेध करण्याकरितांच कीं काय, पण कुत्र्याची कबर दूरीकृत पत्नीच्या कबरीपेक्षां आकारानें आणि बांधकामानेही मोठी आहे. कबर बांधतांना मूळ दोन कमानीची अशी बांधली होती कीं, उगवत्या आणि मावळत्या सूर्याची किरणें तीवर पडावी. पण पश्चिमेकडील कमान बंद केली आहे.

 सलाबतखान हा समर्थ राजकारणी मनुष्य असून, विख्यात शिल्पशास्त्रज्ञ (Engineer) आणि कारागीर (Architect) ही होता. अहमदनगरच्या किल्ल्याची रूपरेखा व कारागिरी ही सलाबतखानाच्या हातचीच. अहमदनगरमधील व सभोव- तालच्या फरिआ बागप्रभृति प्रेक्षणीय इमारती सलाबतखानाच्या अप्रतिम शिल्पकारा- गिरीची साक्ष आजच्या शिल्पशास्त्राच्या वैभवाच्या काळांतही प्रेक्षकांच्या मनावर तत्क्षणीं पटवितात. नगर-भिंगारला आणि किल्ल्याला खच्छपाण्याचा एकसारखा पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेकडील डोंगरांच्या रांगांबघून बांधलेले विस्तीर्ण तलाव आणि त्या तलावांतील पाणी निसर्ग पद्धतीने गाळून ते, ज्यांमधून शहर, किल्ला आणि सभोव- तालचा प्रदेश यांमध्ये खेळवले आहे, असें चुना, वाळू व गोट्यांनी ४०० वर्षांपूर्वी बांधलेले कित्येक मैल लांबीचे भक्कम नळ, हीं अत्यंत लोकोपयोगी कामें आजही या